Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

उस्मानाबादेत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून सामूहिक बलात्कार

A 14-year
, शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (15:43 IST)
उस्मानाबादेत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली  आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे हा प्रकार घडला आहे. 
 
पीडित अल्पवयीन ही नराधम राहत असलेल्या घराच्या शेजारी वास्तव्यास होती. नराधम जबरदस्ती तिच्या घरात शिरले. ते मुलीला बळजबरी घरातून उचलून घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत आणि कलम 363, 376 अंतगर्त गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना याप्रकरणातील तीन आरोपींपैकी दोन आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. तर आणखी एका आरोपीचा शोध सुरु आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जगदीश राऊत हे तपास करीत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिंधू, किदाम्बी सलामीतच पराभूत