Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार व एसटी बसची समोरासमोर धडक,पाच जण जागीच ठार

accident
, मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (14:26 IST)
लातूर-उदगीर रस्त्यावर हैबतपूर पेट्रोल पंपाजवळ कार व एसटी महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
 
उदगीर येथून कुटुंब कारने (MH 24 AB0 4080) सकाळी८.३० च्या सुमारास निघालं होतं. कारमधून सहा जण तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते. लातूर- उदगीर रस्त्यावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालवकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन धडकली.
 
अपघातानंतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख व चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर अशी त्यांची नावं आहेत. तर प्रियांका गजानन बनसोडे गंभीर जखमी आहे. सर्व मृतदेह उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहेत. 

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ