Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नांदेड वैद्यकिय रुग्णालयाच्या अधिष्ठाता व डॉक्टरवर अखेर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

nanded govt hospita
, शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (08:07 IST)
Nanded Medical Hospital डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दोन दिवसांपूर्वी याच रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. जात 12 बालकांचा देखील समावेश होता. दरम्यान, यावेळी बालकासह तिच्या मातेचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली होती. तर, नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
कामाजी टोम्पे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रात्री 1 वाजेच्या सुमारास अंजली यांची नैसर्गिक प्रसूती होऊन त्यांना मुलगी झाली. प्रसूती झाली तेव्हा अंजली व तिच्या बाळाची तब्येत चांगली असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर, सकाळी अंजलीचे रक्त जास्त जात आहे. बाळाची तब्येत बिघडली आहे, असे डॉक्टारांनी सांगितले.
 
तसेच, रक्ताचे व पेशीचे पॉकेटसह इतर मेडीकल बाहेरुन आणण्यासाठी सांगण्यात आले. त्याप्रणामाणे कामाजी टोम्पे यांनी मेडीकल साहित्य बाहेरुन आणुन डॉक्टारांना दिले. परंतु, त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी डीन वाकोडे यांच्याकडे धाव घेतली. माझ्या मुलीचे व तिच्या बाळाची प्रकृती गंभीर असुन रक्त जास्त जात आहे. तुम्ही ताबडतोब डॉक्टर पाठवा अशी विनंती केली.
 
परंतु, त्यांनी कोणतीही हालचाल न करता जाणूनबुजून कामाजी टोम्पे यांना तिथेच बसुन ठेवले असा आरोप त्यांनी केला. बराच वेळ झाल्यावरही कोणतेही डॉक्टर व नर्स पाठवण्यात आले नाही. अंजली आणि त्यांचे बाळ मरणाच्या दारात असताना सुद्धा डीन वाकोडे यांनी कोणतेही हालचाल केली नसल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
 
नातेवाईक रुग्णालयात दाखल असताना बाहेरुन 45 हजारांहून अधिकची औषधी खरेदी करण्यास त्यांनी भाग पाडले होते. तसेच रक्त व इतर तपासण्यासाठीही पैसेही खर्च करण्यात आले होते. त्यात अधिष्ठाता डॉ. एस. आर.वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी जाणीवपूर्वक उपचाराकडे दुर्लक्ष केले. डॉक्टर उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे माय-लेकाचा मृत्यू झाल्याची तक्रार कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिंदे गट-मनसे कार्यकर्त्यांत जुंपली