Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तळोजा कारागृहात हवालदाराला कर्मचाऱ्यांनी अमली पदार्थ तस्करी करण्याच्या प्रयत्नात पकडले

jail
, शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (13:51 IST)
तळोजा कारागृहात चरस, एमडीएमए आणि गांजासह अमली पदार्थ टिफिन बॉक्समध्ये लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृहातील हवालदाराला तळोजा कारागृह कर्मचाऱ्यांनी बुधवारी पकडले असून, त्याला सुरक्षा तपासणीदरम्यान कारागृहाशी संलग्न असलेला एका हवालदाराने पकडले.

आरोपी हवालदाराच्या बॉक्स मध्ये सुमारे 10 लाख हुन अधिक रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यांना खारघर पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
नियमानुसार, कर्तव्यदक्ष असणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली असताना आरोपीच्या टिफिन बॉक्सची तपासणी केल्यावर प्लस्टिकच्या पिशवीत ड्रग्स लपवून नेण्याचे लक्षात आले. 
या प्रकरणी कारागृह प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन ड्रग्स जप्त केले. पोलिसांनी ही माहिती खारघर पोलीस ठाण्यात दिली असून त्यांनी तळोजा कारागृह गाठून हवालदाराला अटक केली.

प्रथमदर्शनी, काही कैद्यांमध्ये वाटण्यासाठी त्याने ड्रग्ज मिळवल्याचा पोलिसांना संशय आहे. खारघर पोलिस ठाण्याच्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला कोठडीत टाकण्यात आले आहे. त्याने हे ड्रग्स कोठून घेतले आणि कोणाला देत होता हे जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी केली जात आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्व नॉन क्रिमी लेयर'ची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची शिंदे सरकारची मागणी