Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

57 लाख वर्षांपूर्वीचे माणसाच्या पायाचे ठसे!

57 लाख वर्षांपूर्वीचे माणसाच्या पायाचे ठसे!
लंडन- संशोधकांनी ग्रीसच्या एका बेटावर तब्बल 57 लाख वर्षांपूर्वीच्या माणसाच्या पावलाचे ठसे शोधले आहेत. या संशोधनामुळे मानवी विकासाच्या सध्याच्या प्रचलित समजाला छेद मिळू शकतो. वेस्टर्न क्रेटमध्ये ट्रॅक्लोस येथे हे पायाचे ठसे आढळले आहेत. आफ्रिकेत आधुनिक माणसाचा ‍विकास झाला असे मानले जाते. मात्र, आफ्रिकेबाहेरही असे आधुनिक मानव होते हे यावरून दिसून येते. 
 
आफ्रिकेत जे मानवी जीवाश्म सापडलेले आहेत ते सर्व 18 लाख वर्षांपूर्वीचे आहेत. मात्र, त्यापेक्षाही पुरातन असे हे पावलांचे ठसे आता ग्रीसच्या बेटावर सापडले असल्याने याबाबत नव्याने संशोधनाची गरज निर्माण झाली आहे. स्वीडनच्या उप्पसाला युनिव्हर्सिटीतील पी. अल्बर्ग यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की हे पदचिन्ह स्पष्टपणे माणासाचेच असून ते अत्यंत पुरातन काळातील आहेत. या पावलातील बोटांचे ठसेही सुस्पष्ट आहेत. पावलाचा आकार, अंगठा आणि बोटे यांची रचना मानवी पावलाचे स्पष्ट संकेत देतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनिया गांधी यांचा कमांडो सहा दिवसांपासून बेपत्ता