महाराष्ट्रातील नागपूरमध्ये पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन मध्ये कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सात मजली सरकारी कार्यालयाच्या इमारतीच्या छतावरून उडी खाली उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, पेसोचे उपनियंत्रक निशांत मृदुल वय 44 यांनी सोमवारी इमारतीवरून खाली उडी मारली. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तसेच त्यांच्या कार्यालयातून किंवा घरातून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याने हे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच गच्चीवर पडलेला त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. एम.टेक. पदवी घेतलेली मृदुल बिहारचे रहिवासी होते.