शिर्डी येथे सात अल्पवयीन मुलांनी आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका 42 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्याची एक धक्कादायक घटना घडली आहे.मित्राचा वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूने मुलांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
गणेश सखाहारी चत्तर असे या मयताचे नाव असून तो कोपरगाव तालुक्यातील चासनळीहांडेवाडी गावाचा रहिवासी होता. गणेश हे गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होते. काही दिवसांनी त्यांचा मृतदेह नांदुर्खी बुद्रुक गावाजवळ उसाच्या शेतात आढळला. त्यासारख्या शरीरावर पाठीत धारदार शस्त्राने वार केले आढळले.
पोलिसांना तपासात आढळून आले की, गणेश रस्त्याने चालत असताना सात मद्यधुंद अल्पवयीन मुलांनी त्यांचे अपहरण केले आणि त्यांना काठ्यांनी आणि ठोस्यांनी मारहाण केली. नंतर गळा आवळून चाकूने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांचा जवळील मोबाईल आणि पैसे घेऊन पसार झाले आणि मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिले. पोलिसांनी या प्रकरणी सातही मुलांना अटक केली आहे.
मृताचा मोबाइल सात जणांच्या टोळीतील एका मुलाने विकत घेऊन चालू केला होता. त्यामुळे पोलिसांनी मोबाइलच्या ट्रॅकिंगमुळे अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आणि त्यानंतर खुनाला वाचा फुटली. वाढदिवसाच्या पार्टीसाठी सातही मुलांना तरुणाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आता सात अल्पवयीन आरोपींवर शिर्डी पोलीस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.