Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपुरात भरधाव ट्रक ने अल्पवयीन मुलाला चिरडले

death
, शुक्रवार, 21 जून 2024 (09:56 IST)
सध्या हिट अँड रनची प्रकरणे वाढली आहे. नागपुरात पुन्हा हिट अँड रन प्रकरणात एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपुरातील काटोल रोड वरील गोरेवाडा झू परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली असून भरधाव येणाऱ्या ट्रक ने 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला चिरडले आहे. या अपघातात मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे. 

अश्विन आठवले असे या मुलाचे नाव आहे. अश्विन हा दुचाकीवरून जात असता गोरेवाडा झू परिसरात एका भरधाव येणाऱ्या ट्रकने  जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात अश्विनचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. 

अपघाताची माहिती मिळतातच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अश्विनचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शव विच्छेदनासाठी पाठविले. या प्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महायुती नेत्यांमध्ये खटपट? अजित पवार वर शिवसेना नेत्याने साधला निशाणा, NCP ने केला पालटवर