Publish Date: Wed, 09 Feb 2022 (12:14 IST)
Updated Date: Wed, 28 Sep 2022 (18:05 IST)
अहमदनगर येथील बुरडगाव (ता. नगर ) परिसरात तुकाराम मोरे यांचे कुंटुब राहत आहे. त्या कुंटुबात असणाच्या तुकाराम मोरे यांचेकडे त्यांची नात मुलीची मुलगी परी अनिल शिंदे ( वय -९ ) मुळगाव भोकर ( ता. श्रीरामपूर ) आली होती. रात्री संपूर्ण कुटुंब झोपेत असतांना नऊ वर्षीय चिमुरडीच्या अंगावर भिंत पडून जागेवर मयत झाल्याची घटना घडली.
यात परीचा जागीच मुत्यू झाला. तर लक्ष्मी राजू चौघुले ( वय -९ ), सौरभ नवनाथ पवार ( वय -१३ ) अनिकेत मोरी (रा. बुरडगाव ) हे सर्व जखमी आहेत.