Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनमाडनजिक भीषण अपघात; कार झाडावर आदळून चौघे मित्र ठार

मनमाडनजिक भीषण अपघात; कार झाडावर आदळून चौघे मित्र ठार
, बुधवार, 11 मे 2022 (15:25 IST)
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघात यांची जणू काही मालिकाच सुरू झाली आहे. या रस्ते अपघातांमध्ये अनेक नागरिक मृत्यूमुखी पडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात मनमाड येथील चार तरुण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. चौघे मित्र ठार झाल्याने मनमाडमध्ये शोककळा पसरली आहे.
 
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचूर झाली. या अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे  चार मित्हेर जागीच ठार झाले. अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. हे सर्व जण पाच मित्र एका कार्यक्रमासाठी येवला येथे गेले होते. त्यानंतर अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर जेवायला गेले होते, मनमाडकडे येताना अपघात हा झाला. या अपघातात कार झाडावर आदळल्याने पाच पैकी चौघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे खाेळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पाेलिसांना वेळ लागला. त्यामुळे दाेन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या.
 
मनमाड-मालेगाव महामार्गावरील कुंदलगावजवळ दोन दिवसांपूर्वी दुपारी प्रवासी अँपेरिक्षा व आयशर ट्रकमध्ये धडक झाली. यात चार जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. जखमींमध्ये एका पाच वर्षीय बालिकेचा समावेश होता. तिच्यावर मालेगाव येथील रुग्णालयात, तर दुसर्‍या एका गंभीर जखमीवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात अनिल शिवाजी वाघ (वय 42, रा. एरंडगाव, ता. मालेगाव), वाल्मीक वामन बिडगर (वय 52, रा. कानडगाव, ता. चांदवड), विक्रम राजाराम काळे (रा. काळेवाडी, ता. मालेगाव), बबन जगन सोनवणे (वय 53, रा. रायपूर, ता. चांदवड) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. किरण साहेबराव बिडगर ही पाच वर्षांची बालिका गंभीर जखमी झाली होती.
 
गेल्या आठवड्यात भरधाव मालट्रकने समाेरून येणा-या कंटेनरला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. दाेन्ही वाहनांचे चालक, ट्रकचा क्लिनरसह चार जण जागीच ठार तर अन्य दाेेघे गंभीर जखमी झाले होते. हा अपघात मालेगाव – मनमाड राेडवरील चंदनपुरी शिवारात बुधवारी सकाळी ७.३० वाजता घडला होता. अपघातानंतर सुमारे चार तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. हरियाणा येथील एक ट्रक लिंबूच्या गाेण्या घेऊन मनमाडहून मालेगावकडे येत हाेता. यावेळी चारचाकी वाहनांची वाहतूक करणारा कंटेनर (एनएल ०२ जी १५४३) मनमाडच्या दिशेने जात हाेता. चंदनपुरी शिवारातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक समाेरून येणा-या कंटेनरवर अादळला. अपघात इतका भीषण हाेता की दाेन्ही वाहनांचा समाेरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला. कंटेनरमधील दाेघे गंभीर जखमी झाले अाहे. कंटेनरमध्ये सापडलेल्या कागदपत्रांवरून पाेलिसांना कंटेनरचालक अंगदकुमार मूणमूण प्रसाद (वय २४, रा. कानपूर) व जखमी झालेला केशवराय जनार्दन राय (रा. बंगलाेर) यांची अाेळख पटविण्यात यश अाले अाहे. अन्य तिघे मृत व दाेघा जखमींची माहिती मिळलेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी