Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बांगड्यांवरून महिलेला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

बांगड्यांवरून महिलेला बेदम मारहाण, गुन्हा दाखल
, शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (15:13 IST)
बांगड्या घालणं हे बऱ्याच महिलांना आवडत नाही.तर काही महिलांना हात भरून बांगड्या घालणं आवडत. रंगबेरंगी बांगड्या घातल्यामुळे मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. नवीन फॅशनच्या बांगड्या घातल्यामुळे एका महिलेला तिच्या सासरच्यांनी आणि नवऱ्याने बेदम मारहाण केली असून पीडित महिलेने नवरा आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

हा सर्व प्रकार 13 नोव्हेंबर रोजी घडला असून पीडितेने नव्या फॅशनच्या बांगड्या घातल्यावरून तिच्या पतीने तिला या बांगड्या घालू नकोस, असं म्हणत वाद घातला. नंतर पीडित महिलेच्या सासूने तिचे केस धरून ओढले आणि कानशिलात लगावली. तर पतीने तिला बेल्ट ने मारहाण केली. हे सर्व प्रकार घडत असताना पीडित महिलेच्या सासरचे मंडळी तसेच सासरचे नातेवाईक देखील तिथे होते. मात्र तिला कोणीही वाचवले नाही. 

घडलेल्या प्रकारामुळे महिला घाबरली आणि तिने पुण्यात तिच्या आईवडिलांकडे धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. तिने नवरा आणि सासरच्यां मंडळींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार पुणे पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईत ट्रान्सफर केली असून पीडित महिलेच्या सासरच्या मंडळी आणि पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 




 Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमृता फडणवीसांचा ‘झुमका गिरा’ व्हिडीओ व्हायरल