महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मंगळवारी मध्यरात्री एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या तीन महिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
आरोपी तरुणाचा महिलांशी जुना वाद होता. रात्री 11 वाजता शंकर नगर परिसरात आरोपींनी तिघांवर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या संध्या घाटे (45) यांचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोरमा घाटे आणि हर्षा घाटे गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्री पुन्हा दोन्ही कुटुंबांमध्ये कशावरून तरी वाद झाला.अरोपीने महिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या मध्ये एकीचा दुर्दैवी मृत्यु झाला तर दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.