Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार,लग्नाची खोटी कागदपत्रे, दुसऱ्याचे बाळ अन् पोलिसांना चकवा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार,लग्नाची खोटी कागदपत्रे, दुसऱ्याचे बाळ अन् पोलिसांना चकवा
, मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (15:03 IST)
शहरात मामाकडे राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीला २१ वर्षांच्या तरुणाने पळवून नेले होते.तिचे वय १८ दाखवणारा खोटा दाखला जोडून लग्न झाल्याची कागदपत्रे तयार केली.पोलिसांनी अडवले तर तिच्या हाती दुसऱ्याचे बाळ देऊन आम्हा दोघांना बाळ झाल्याचे दाखवले. इतक्या सगळ्या खोट्या बनावाचा पर्दाफाश जळगाव पोलिसांनी करत अमरावती येथील भारत राजा चावरे याला अटक केली.पोलिसांच्या तत्परतेने एका मुलीचे आयुष्य वाचले असून पोलिसांचे कौतुक होत आहे.
 
जळगाव शहरात मामाकडे वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला भारत राजा चावरे याने पळवून नेले होते. तेथे कागदपत्रांमध्ये खोडाखोड करून लग्न केल्याचे कागदपत्र तयार केले.इतकेच नाही तर मुलीच्या हातात दुसऱ्याचे बाळ देऊन आम्हाला एक मूल असल्याचादेखील त्याने बनाव केला.जळगाव पोलिसांनी चावरे याचा या कृत्याचा भंडाफोड केला असून त्याच्यासह गुन्ह्यात मदत करणाऱ्या भाऊ व आईलाही अटक केली आहे.
 
अत्याचाराचे कलम वाढविले
पोलिसांनी या प्रकरणात भारत याने पीडितेशी अनैतिक संबंध ठेवल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरुद्ध बलात्कार, बाललैंगिक अत्याचाराचे कलम वाढविण्यात आले आहे. कागदपत्रामध्ये खाडाखोड करून बनावट दस्ताऐवज तयार केला म्हणून फसवणुकीचे ४२० व अल्पवयीन मुलीशी लग्न केले म्हणून बालविवाह कायद्याचेही कलम वाढविण्यात येणार आहे. अटकेतील तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमृता प्रीतम : साहिर लुधियानवी आणि इमरोज पलिकडेही ज्यांचं जग होतं...