Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमदार नितीन देशमुख यांना ACB नं नोटीस बजावली असून १७ जानेवारीला देशमुखांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

nitin deshmukh
, सोमवार, 9 जानेवारी 2023 (20:37 IST)
आमदार नितीन देशमुख यांना ACB नं नोटीस बजावली असून १७ जानेवारीला देशमुखांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी ठाकरे गटाचे राजन साळवी यांना एसीबीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. आता नितीन देशमुखांना एसीबीनं नोटीस बजावल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
याबाबत आमदार नितीन देशमुख म्हणाले की, १७ तारखेला अमरावतीत लाचलुचपत विभागाकडे चौकशीसाठी हजर राहावे यासाठी नोटीस दिली आहे. मालमत्तेच्या विवरण पुराव्यासोबत हजर राहण्यास सांगितले आहे. १७ तारखेला मी रितसर कार्यालयात हजर राहीन. आरोप कुणी करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. एका आमदाराला नोटीस देताना तक्रार कुणी दिली याचा उल्लेख नाही. माझ्याजवळील कुठली प्रॉपर्टी अवैध आहे याचीही माहिती नाही. याबाबत मी लेखी खुलासा १७ तारखेला चौकशीसाठी हजर झाल्यावर करेन असं देशमुखांनी स्पष्ट केले.

कोण आहेत नितीन देशमुख?
नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. गत तीन टर्मपासून भारिप-बमसंकडे असलेल्या या मतदारसंघात नितीन देशमुख यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. राज्यातील सत्तानाट्यात नितीन देशमुखांचे नाव प्रामुख्याने समोर येते. एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले नितीन देशमुख हे तिथून सुटून थेट उद्धव ठाकरेंकडे पोहचले होते. ठाकरेंकडे पोहचताच नितीन देशमुखांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप लावले होते.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काशिद समुद्रात औरंगाबादचे ६ जण बुडाले, चौघांना वाचवलं; एकाचा मृत्यू, १ बेपत्ता