rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई-आग्रा महामार्गावर दोन ठार

accident
मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटीजवळील सिन्नर फाट्यावर शनिवारी मध्यरात्री लोखंडी सळ्या घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने दोनजण जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी झाला. याबाबत पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, ट्रकचालक फरार आहे.
 
भिवंडी येथून मालेगावकडे लोखंडी सळ्या घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच ४३ ई २२३९) शनिवारी रात्री घोटीजवळ सिन्नर फाटा येथे आला असता, येथील गतिरोधकावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर उलटून झालेल्या अपघातात नबी हुसेन मोहम्मद इद्रिस मलिक (५०, रा. मालेगाव) यांच्यासह एक अनोळखी इसम ट्रकखाली दबल्याने जागीच ठार झाले. याच ट्रकमधील अजून एक अनोळखी इसम जखमी झाला. दरम्यान, अपघाताची माहिती समजताच हवालदार सुहास गोसावी यांच्यासह कृष्णा कोकाटे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन स्थानिक युवकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. नंतर वाहतूक पूर्ववत केली.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयपीएल मधील स्वप्नवत प्रवास - नीतीश राणा