Publish Date: Mon, 08 Apr 2024 (12:30 IST)
Updated Date: Mon, 08 Apr 2024 (12:34 IST)
नागपुरात मानकापूर परिसरात भरधाव जाणाऱ्या एका ट्रक 12 वाहनांना जोरदार धडक दिली. या मध्ये 9 कार, एक रुग्णवाहिका आणि 2 दुचाकींचा समावेश आहे. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
सदर घटना नागपुरातील मानकापूर चौकात घडली आहे. उड्डाण पुलावरून येणाऱ्या भरधाव ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या धडकेत सुमारे पाच ते सहा हुन अधिक कारांचे नुकसान झाले आहे.या कार मधील चार प्रवाशांना दुखापत झाली आहे. या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की, वाहने एकमेकांवर आदळली.अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अपघातांनंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.
वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक लाल सिग्नलवर थांबलेल्या वाहनांवर मागून धडकला आणि त्यांनतर कार दुसऱ्या कारवर जाऊन आदळली काही कार आणि दुचाकी या सोबत फरफटत गेल्या. या अपघातात एक दुचाकी या वाहनाच्या खाली चिरडली गेली. या अपघातात चौघे जण जखमी झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि वाहतूक सुरळीत केली. जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे कारण पोलीस शोधत आहे.