Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

लक्झरी उलटून भीषण अपघात; तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

accindent in barshi
बार्शी , सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (11:29 IST)
बार्शी- कुर्डूवाडी रस्तवरील दुर्घटना
मुखेडहून मुंबईकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसचालकाचा ताबा सुटल्याने बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर बसमधील तेवीस प्रवाशी गंभीर जखी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुारास बार्शी- कुर्डूवाडी रस्तवर वांगरवाडी फाट्याजवळ घडला.
 
मुखेड (जि. नांदेड) येथून खाजगी लक्झरी बस (ए.एच. 04 जी.पी. 5151) ही मुंबईकडे निघाली होती. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बस बार्शी क्रॉस करून कुर्डूवाडीमार्गे मुंबईकडे जात होती. सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बस वांगरवाडी शिवार आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलटली. रात्रीच्या प्रवासात सर्व प्रवाशी झोपलेले असताना वेगात असलेली बस अचानक उलटल्याने प्रवासी सावध होण्याआधीच अनेकजण बसच्या खाली अडकले. घटनेची माहिती मिळतताच बार्शी तालुका पोलीस ठाणचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे व त्यांच्या सहकार्‍यांनी मदतकार्य सुरू केले. रात्रीच्यावेळी मदतीसाठी मनुष्यबळ कमी असल्याने उलटलेल्या बसखाली अडकलेले प्रवाशी काढण्यासाठी पोलिसांना जेसीबी मशीन आणावी लागली. बस पन्नास फुटांपर्यंत घसरत जाऊन त्याच्या खाली सापडून आर्वी मोहन देवकते (रा. विंदगी खुर्द ता. अहमदपूर जि. लातूर), फैज इस्माईल पठाण (वय 3 रा. दामूननगर आदिवली मुंबई), धनश्री ज्ञानेश्वर मुकनेर रा. हिप्परगा (शहा) ता. कंदार जि. नांदेड) या तिघींचा अंत झाला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात फेसबुक वापरकर्त्यांपैकी ४० टक्के व्यक्ती फेसबुकवर सक्रिय