Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलीस भरतीला निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

death
, रविवार, 25 फेब्रुवारी 2024 (16:35 IST)
पोलीस भरतीच्या सरावासाठी निघालेल्या 21 वर्षीय तरुणाचा रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी-नागपूर मार्गावर भोसे येथून सांगली कडे जायला निघालेल्या तरुणाचा पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शिरीष खंबाळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 
 
शिरीष हा दोन दुचाकी वरून चौघे मित्र पहाटेच्या सुमारास रत्नागिरी-नागपूर मार्गावर भोसे येथून सांगली जिल्हा क्रीडा संकुलाकडे पोलीस भरती प्रशिक्षणाच्या सरावासाठी निघालेला असताना रत्नागिरीच्या दिशेने जात असलेला एक भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने मागून जोरदार धडक दिली तर या धडकेत शिरीष जागीच ठार झाला तर त्याचे 3 मित्र गंभीर जखमी झाले. विश्वजित मोहिते, प्रज्ज्वल साळुंखे आणि प्रथमेश हराळे हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. 
 
अपघाताची माहिती मिळाल्यावर भोसे ग्रामस्थांनी आणि तरुणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिघाना गंभीर दुखापत झाली असून त्यांना शासकीय मदत मिळण्याची मागणी केली जात आहे. 

Edited By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs ENG: रांची कसोटीत ध्रुव जुरेलने अर्धशतके झळकावले