बुधवारी कुवेतच्या मंगफ शहरात एका 6 मजली इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीत अनेक देशांचे लोक बेकायदेशीरपणे राहत होते. या आगीत 45 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.या मृतांमध्ये महाराष्ट्रातील डेनी बेबी करूणाकरन यांचा समावेश आहे. डेनी हे गेल्या 4 वर्षांपासून कुवेतमधील एका खासगी कंपनीत अकाउंटंट आणि सेल्स कोऑर्डिनेटर म्हणून कामाला होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरात आई वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे. बहिणीचा नवरा कुवेत मध्ये कामाला आहे. 33 वर्षीय डेनी पालघर जिल्ह्यातील विरारचे रहिवासी होते.
मंगफ शहरातील एका सहा मजली इमारतीला बुधवारी भीषण आग लागली, ज्यात 48 जणांचा मृत्यू झाला. 176 भारतीय कामगारांपैकी 45 मरण पावले आणि 33 रुग्णालयात दाखल आहे...
तांमध्ये केरळमधील 23, तामिळनाडूतील 7, उत्तर प्रदेशमधील 3, ओडिशातील 2 आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आणि हरियाणामधील प्रत्येकी 1 समावेश आहे. इतर मृत पाकिस्तान, फिलिपाइन्स, इजिप्त आणि नेपाळमधील आहेत.
शुक्रवारी सकाळी कोची विमानतळावर 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन हवाईदलाचे विमान कुवेतहून भारतात दाखल झाले. मृतदेह पाहतातच सर्वांचे डोळे पाणावले.
सकाळपासूनच मृतांचे नातेवाईक विमानतळावर उपस्थित होते. विमानतळावर केरळ सरकारचे मंत्री, अधिकारी आणि मोठ्या संख्येने पोलिस दलही उपस्थित होते.
या अपघातांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉग्रेसचे नेते राहुल गांधी, आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बेनर्जी यांनी शोक व्यक्त केले आहे.