Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीत अटक

बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीत अटक
, गुरूवार, 1 जुलै 2021 (17:28 IST)
बारामती : मुंबईत बोगस लसीकरण करणारा आरोपी राजेश पांडे याला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. भेसळयुक्त द्रव हे कोविडची लस असल्याचे भासवून मुंबईत नागरिकांसाठी लसीकरण केलं जातं होतं. याबरोबरच हे आरोपी वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
 
राजेश पांडेने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण आयोजित केल्याचा आरोप आहे. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे. आरोपी राजेश पांडे याला बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉजमधून पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्यावर कांदिवली पोलिसांची टीम आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीकडे रवाना झाली आहे.
 
कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लसीकरण करण्यात आले होते. सोसायटीमधील ३९० सदस्यांकडून प्रत्येकी १२६० रुपये घेत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली होती. 
 
लसीकरणानंतर सोसायटीतील नागरिकांनी प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरण आयोजकांनी लस घेतलेल्या सदस्यांची माहिती घेतली. त्यानंतर या सदस्यांना विविध रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिले. या प्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण ८ आरोपींना अटक केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगातील प्रथम फ्लाइंग रेसिंग कारने इतिहास रचला, एका शहरातून दुसर्‍या शहरात उड्डाण केले