Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रक्तदाब मोजणारे उपकरण विनापरवाना उत्पादन करणाऱ्या अपोलो फार्मसी आणि कंन्सेप्टरेन्युअर व्हेंचर वर कारवाई

रक्तदाब मोजणारे उपकरण विनापरवाना उत्पादन करणाऱ्या अपोलो फार्मसी आणि कंन्सेप्टरेन्युअर व्हेंचर वर कारवाई
, शनिवार, 28 मे 2022 (08:33 IST)
मेसर्स  Conceptreneur Ventures प्रा. ली. गोवंडी मुंबई ही संस्था B.P.monitor या रक्तदाबासाठी वापरात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणाचे (Medical Devices) में विनापरवाना उत्पादन करत असल्याची माहिती प्रशासनास प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे उक्त संस्थेच्या शाह इंडस्ट्रीयल इस्टेट देवनार, गोवंडी या ठिकाणी बृहन्मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांनी छापा टाकून पडताळणी करण्यात आली.
 
कारवाईचे वेळेस वरील संस्थेत विनापरवाना Blood Pressure Monitor या रक्तदाब मोजणाऱ्या वैद्यकीय उपकरण उत्पादन करण्यात येत असल्याचे आढळून आले.  या उपकरणाच्या उत्पादनासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाने या उपकरणाच्या उत्पादनासाठी परवाना देण्यास जून २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली होती वरील संस्थेने जून २०२१ नंतर देखील उत्पादन परवाना न घेता या उपकरणाचे उत्पादन विक्री करणे सुरू ठेवले होते. त्यामुळे सदर ठिकाणी उपलब्ध असलेला विनापरवाना उत्पादित Beep Blood B.P. monitoring Machine या उपकरणाचा रु १०,३५, ००० साठा जप्त करण्यात आला.
 
पुढील तपासात संस्थेस सदर उपकरणाच्या खरेदी विक्रीचा तपशिल व विक्री करण्यात आलेला साठा बाजारातून परत मागविण्याचे निर्देश देण्यात आले होते. सादर करण्यात आलेल्या माहितीवरून ही उपकरणे New Era Corporationn, China या संस्थेकडून आयात करण्यात आले होते. सदर आयातीसाठी लागणारा परवाना देखीन मंजूर नसल्याचे तपासात आढळून आले में Conceptreneur Ventures व मे Apollo Pharmacy (A unit of Aplollo Hospitals Enterprises Ltd) यांच्यात करार असून सदर उपकरणाने ब्रांड नाव (Apollo Pharmacy fully automatic upper arm style Blood Pressure Monitor) हे Apollo Pharmacy च्या मालकीचे Conceptreneur Ventures ने सुमारे ८२,५१० इतक्या मोठ्या संख्येने सदर उपकरणे Apollo Pharmacy साठी बिना परवाना तयार करून त्याची विक्री केली आहे.
 
या दोन्ही संस्थानी Covid-१९ या रोगाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर सदर उपकरणे संगनमताने विनापरवाना उत्पादन त्याची गुणवत्ता चाचणी न करता विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. दाब मोजण्याचे उपकरण जर सदोष असेल तर त्याचा परिणाम रुग्णास देण्यात येणाऱ्या उपचारावर पडून चुकीच्या निदानामुळे रुग्णाच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
 
या प्रकरणात औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मेडिकल डीवायसेस नियम, २०१७ से उल्लघन केल्याने तसेच संस्थेने Covid-१९ या जागतिक महामारीच्या काळात गुणवत्ता चाचणी न करता संगनमताने विनापरवाना वैद्यकीय उपकरणाचे उत्पादन केल्याने भा.द.वी. च्या कलम ४२० व ३४ सहवाचन औषधे सौदर्य प्रसाधने कायदा १९४० कलम १८ (क) अंतर्गत गोवंडी पोलीस स्टेशन येथे पुढील तपास चौकशीसाठी दि. ४/५/२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आहे.
 
मे Apollo Pharmacy Conceptreneur Ventures या संस्थाना बाजारात विक्री करण्यात आलेल्या प्रत्येक ग्राहकाकडून सदर उपकरणाचा साठा परत घेण्यासाठी सर्व प्रमुख वर्तमानपत्रात नोटीस देण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार Apollo Pharmacy ने विविध वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिल्याचे प्रशासनास कळविले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

१३३ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासंदर्भात दोन व्यक्तींना अटक