Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लिंबू पाणी अस्वच्छपणे बनवण्याऱ्यावर कारवाई

लिंबू पाणी अस्वच्छपणे बनवण्याऱ्यावर कारवाई
, शनिवार, 13 एप्रिल 2019 (09:47 IST)
मुंबईतल्या कुर्ला रेल्वे स्थानकावर घाणेरडं लिंबू सरबत बनवणाऱ्या स्टॉल धारकावर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली असून त्याच्यावर पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सहा आणि सातवर असेलल्या स्टॉलवरील लिंबू सरबत हे निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलं होतं. या लिंबू सरबताच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
 
काही दिवसांपूर्वी कुर्ला स्थानकावरील लिंबू पाण्याच्या स्टॉलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या स्टॉलवर लिंबू पाणी अस्वच्छपणे बनवण्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची  या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. रेल्वे प्रशासनाने स्थानकावर विकल्या जाणाऱ्या खुल्या पेयांवर बंदी घातली. त्यानंतर प्रशासनाने स्टॉलवर विकण्यात येणाऱ्या लिंबू सरबताचे नमुने पालिकेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानमध्ये महागाई, दुधाचा दर 180 रुपये