Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार

तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार
, बुधवार, 3 मार्च 2021 (07:35 IST)
राज्यात ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य रवींद्र फाटक व महादेव जानकर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. 
 
राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असेल त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे सांगून गृहमंत्री देशमुख म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने ११ ठिकाणी छापे टाकले असून ४२ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
 
वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय म्हणता, दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत