मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत असला, तरी ठाकरे घराण्यातील व्यक्ती आतापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. मात्र ठाकऱ्यांची तिसरी पिढी कदाचित आखाड्यात स्वतः उतरु शकते.
बाळासाहेब ठाकरेंचा नातू, उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ सुपुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गरज पडल्यास स्वतः निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात सूतोवाच केलं आहे. ‘मी कधीच स्वतःला निवडणुकांपासून दूर ठेवलेलं नाही. जर कधी वेळ पडलीच तर मी तयार आहे’ असं आदित्य यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने आदित्य ठाकरे प्रचारसभा आणि बाईक रॅली काढत आहेत.