Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदित्य ठाकरे यांचे सावंतवाडीत येऊन मंत्री दीपक केसरकरांवर टीकास्त्र

Aditya Thackeray
, शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (08:23 IST)
सावंतवाडी : मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना जास्त महत्त्व देऊ नका. आम्ही येथील जनतेला महत्त्व देतो. ज्यांना महत्त्व नाही त्यांच्याविषयी काय बोलायचं अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. हे 50 खोके वाले गद्दार आहेत . हिम्मत असेल तर या गद्दार सरकारने निवडणुकीला सामोरे जावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडीत चिताराळीचा राजा गणेशोत्सवाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक ,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सागर नाणोसकर, अशोक गुप्ता ,एडवोकेट राघवेंद्र नार्वेक,र देवराज सुराणा शब्बीर मणियार, सतीश नार्वेकर ,शैलेश गवंढळकर, रेशमी माळवदे ,सुरेश भोगटे, महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक अभ्यासासाठी समिती नेमणार