मुंबई नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र एकत्रित प्रवेश परीक्षेत (MH-CET) पारदर्शकता आणण्यावर भर देत शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची माहिती द्यावी आणि त्यांच्या उत्तरपत्रिकाही द्याव्यात, अशी मागणी केली.ते आज एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले, की यंदा सीईटी परीक्षा विचित्र पद्धतीने घेण्यात आली असून दोन पेपरच्या परीक्षा 30 बॅच मध्ये घेण्यात आल्या यातील एका पेपरची परीक्षा 24 बॅच मध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दाखवून त्यांचे गुण सांगावे अशी आमची मागणी आहे.
UGC-NET परीक्षा रद्द करणे आणि NEET मधील अनियमिततेच्या आरोपांचा संदर्भ देत ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा विचार असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात सीईटी महाराष्ट्र सरकार आयोजित करते.
प्रश्नपत्रिकेत 54 चुका असून विद्यार्थ्यांनी 1,425 आक्षेप घेतल्याचा दावा ठाकरे यांनी केला. माजी मंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांचे निकाल 'टक्केवारी' स्वरूपात जाहीर केले जातात. ते म्हणाले, एका पेपरची परीक्षा 24 बॅचमध्ये घेण्यात आली. काही पेपर अवघड होते तर काही सोपे होते.
ज्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांना जास्त 'टक्केवारी' आणि ज्यांना जास्त गुण मिळाले आहेत त्यांना कमी 'टक्केवारी' मिळाली आहे. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या प्रमुखाला अद्याप निलंबित का करण्यात आले नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.