केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून दोन्ही कुटुंबात नेहमी खटके उडत असतात. यातच राणे कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून, दोन्ही कुटुंबातील आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. निलेश आणि नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत असतात. आता पुन्हा एकता निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.
काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता राणेंनी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आता मात्र निलेश राणे यांनी ट्विट करत थेट आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिला आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "आदित्य ठाकरेचे पार्ट्यांमध्ये दारू पितानाचे फोटो जाहीर करणार - श्री पावसकर. आदित्य एरबस कंपनी विसरला आणि कल्टी..." अशा आशयाचे ट्विट राणेंनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर अद्याप आदित्य किंवा ठाकरे गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Edited By- Ratnadeep Ranshoor