विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला होता. बंडखोर शिंदे गटाने शिवसेनेच्या व्हिपविरोधात मतदान केलं आहे. या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरसुद्धा ही कारवाई होणार आहे. न्यायालयात दाद मागणार असल्याचेसुद्धा आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधान भवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात मध्यावदी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. जनता या निवडणुकांसाठी सज्ज आहे. आम्हीसुद्धा निवडणुकांसाठी सज्ज आहोत. शिवसेना कधीच संपणार नाही. ज्यांना जन्म पक्षात अशा प्रकारचे कृत्य केलं. ते दुसऱ्या पक्षातसुद्धा बंडखोरी करतील असे आदित्य ठाकरे म्हणाले. बंडखोर आमदार जनतेला भेटतील तेव्हा पाहू असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.