Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

”2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही”; निलेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर

”2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही”; निलेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर
, मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (08:43 IST)
शिवसेने नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही,” असं राऊत यांनी म्हटलंय. त्यानंतर आता निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. “सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही,” असा पलटवार निलेश राणे यांनी केलाय. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
 
दखल घेण्यासारखं हे पात्र नाही मात्र राणेंची हीच पिढी जे काही करायचं ते करेल राणेंना पुढच्या जन्मावर विश्वास नाही आम्ही काही करण्यापेक्षा कोकणातील जनताचं आता शिवसेनेला संपवेल याची खात्री आहे कारण यांना करायचं काहीच नाही बोलाचा बात आणि बोलाचीच कढी असली यांची अवस्था. यांचे मुख्यमंत्री सुद्धा तसेच आणि आमदार खासदार सुद्धा. त्यामुळे जन आशिर्वाद यात्रा कशासाठी आहे हे विनायक राऊत यांना समजणार नाही नारायण राणेंसारखा वजनदार माणूस कोकणासाठी काय करून आणू शकतो हे राऊतांना समजणार नाही कारण साधी बालवाडी सुद्धा बांधली नाही त्यामुळे त्यांना महत्व समजणार नाही.
 
कोकणातील हीच पिढी शिवसेनेला संपवेल त्यामुळे फार सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही याची खात्री आम्ही ही घेतलीय लोकही घेतील अशी घणाघाती टीका निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर केली आहे.
 
भाजपच्या नेत्यांच्या जनआर्शिवाद यात्रेवरून शिवसेनेचे विनायक राऊत यांनी टीका करतानाचं केंद्रीय मंञी नारायण राणेंनाही टिकेचं लक्ष केल होतं जनआर्शिवाद हा शब्द शिवसेनेचाचं भाजपने हा शब्द चोरला तर असं म्हणत अडगळीत टाकलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोकणात सेनेची ताकद कमी होणार नाही. नारायण राणेच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही नारायण राणेना शिवसेनेनीच दोन वेळा पराभव दाखवून दिलाय नारायण राणे म्हणजे पनवती अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली होती या टीकेचा जोरदार समाचार निलेश राणेंनी घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाचा दगा…शेतकऱ्याचे पीक वाचविण्यासाठी धडपड