दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ११ वी प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित केली होती. मात्र हायकोर्टाने सर्व गोष्टींचा विचार करत निर्णय घेतला. यानंतर मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. सीईटी परीक्षेसंदर्भात मुंबई हायकोर्टाने दिलेला निकाल अभ्यासून अकरावी प्रवेशासंदर्भात पुढील निर्णय घेऊ असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
यावर्षी अकारावीच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय प्राप्त झाल्यानंतर आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु करणार आहोत. मात्र या निकालामध्ये काय लिहिलयं ते पाहावे लागेल. अंतर्गत मूल्य़मापनाद्वारे लावण्यात आलेला निकाल मान्य करण्यात आला आहे. मधल्या काळात कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने काही विद्यार्थ्यांना लिंकमध्ये येऊन रजिस्ट्रर करता आले नाही. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांचा प्रवेश उशिरा झाला होता. मात्र यंदा आम्ही प्रवेश लवकर व्हावेत यासाठी निर्णय घेणार आहोत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
शहरी भागात ऑनलाईन अॅडमिशन करतो मात्र खेडेगावत ऑफलाईन अॅडमिशन होते. यंदाही नियम निकषांच्या आधारे अकरावी प्रवेश परीक्षा घेणार आहोत. अजूनही रेल्वे बंद असल्याने सीईटी घ्यायची झाल्यास मुलांच्या लोजेस्टीकच्या बाबतीत तय़ारी करावी लागेल. पेपर हातात आल्यानंतरचं आपण यावर बोलू. आत्तापर्यंत १२ लाख मुलांचा डाटा मिळाला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत. असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.