आज रात्मंरी अर्गथात मंगळवार पासून होत असलेला रिक्षाचालकांचा संप मागे घेण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर कामगार नेते शशांक राव यांनी हा संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे. या संपात प्रमुख मागण्या होत्या त्यात भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करा आदीसाठी रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने ९ जुलै रोजी संपाची हाक दिली होती. या संपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील रिक्षाचालक सहभागी होत होते. मात्र ९ जुलै रोजी होणाऱ्या संपाला काही संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये लालबावटा रिक्षा युनियन डोंबिवली, स्वाभिमान टॅक्सी संघटना यांचा समावेश होता, तर रिक्षा क्रांती संयुक्त कृती समिती आणि भाजप प्रणीत नवभारतीय शिववाहतूक संघटनेने या संपास विरोध केला होता. तरीही भर पावसात या संपात कोण सामील होणार याबद्दल सभ्रम आहे.