Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

उद्धव यांच्यानंतर आता आदित्य ठाकरेंनीही केला कुणाल कामराचा बचाव

aditya thackeray
, सोमवार, 24 मार्च 2025 (17:12 IST)
Kunal Kamra News: महाराष्ट्रात स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावरील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आमनेसामने उभे असतात. एकीकडे, सत्ताधारी महायुती आघाडीतील पक्षांचे नेते कामरा यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत आहेत आणि त्यांना विरोध करत आहेत. तर दुसरीकडे यूबीटी शिवसेना कुणाल कामराच्या समर्थनार्थ बाहेर पडली आहे. जिथे यूबीटी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र आदित्य ठाकरेही कामराच्या बचावात उतरले आहेत.  
 ते म्हणाले, कुणाल कामराने कोणाचेच नाव घेतलेले नाही. मग एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी त्यांना देशद्रोही आणि चोर का म्हटले? कुणाल कामराने मोदीजी आणि त्यांच्यापक्षाबाबद्दल टिप्पणी केली होती तेव्हा काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण आता कामरा जे काही बोलले तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या समर्थकांनी कामरा यांना शिवीगाळ केली.  
नागपुरात झालेल्या तोडफोडीच्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांकडून करवणार अशी घोषणा मुख्यमंत्रींनीं केली होती. तर काल शिंदे समर्थकांकडून केलेल्या नुकसानाची भरपाई होणार का ?असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला.
तसेच कुणाल कामरा यांनी माफी का मागावी. जर एकनाथ शिंदे देशद्रोही आणि चोर आहे तर कुणाल कामराने माफी मागावी. मात्र, यासाठी एकनाथ शिंदे यांनी आधी ते देशद्रोही आणि चोर आहेत की नाही याचे उत्तर द्यावे, असेही आदित्य म्हणाले
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेस वॉक करणारी धावपटू प्रियांका गोस्वामी ने 35 किमी धावण्यात राष्ट्रीय विक्रम केला