पिकांवर फवारणीसाठी मजूर शोधताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा मजूर वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे त्रस्त झाले आहेत. यावर आता कृषी विभागाने तोडगा काढला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना चार लाख रुपयांच्या अनुदानात ड्रोन देण्याची योजना राबविण्यात आली आहे
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकासह कापूस, सोयाबीन, तूर, तीळ आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. धान पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन तेथे घेतले जाते. रब्बी हंगामात कडधान्ये, भाजीपाला, मका, उन्हाळी भात या पिकांची लागवड केली जाते. हंगामानुसार पिकांवर विविध कीड व रोग येतात.
अशा स्थितीत पिकांवर औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: फवारणीच्या कामात बराच वेळ जातो. अशा स्थितीत कृषी विभागाने चार लाख रुपयांच्या अनुदानावर ड्रोन उपलब्ध करून देण्याची योजना राबवल्याची घोषणा केली आहे. जेणे करूँ शेतकऱ्यांचा वेळ वाचेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतीसंदर्भातील कागदपत्रेही असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल.