Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जुनी पेन्शन योजनेसाठी नव्याने अध्यादेश काढा

जुनी पेन्शन योजनेसाठी नव्याने अध्यादेश काढा
मुंबई , बुधवार, 3 जुलै 2019 (16:51 IST)
जुनी पेन्शन योजनेत अभ्यासगट स्थापन करुन काही होणार नाही तो पळपुटेपणा आहे असा आरोप करतानाच नवीन अध्यादेश काढून शिक्षकांना पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.
 
जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत लावून धरला. जे निर्णय सरकार घेते ते निर्णय समाजाच्या भल्यासाठी नसतील तर आपण लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे. नवीन कायदा करायचा असेल तर आणि त्यात कोर्टाचा अवमान होऊ नये असे असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत असेही अजितदादा म्हणाले.
 
मागच्या काळात होते हे सांगणे बंद करा. आमच्याकडून राहून गेले म्हणून आम्हाला इकडे बसवले व तुम्हाला तिकडे बसवले आता हे काढायचे बंद करा असा टोला लगावतानाच आता काळ तुमचा आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता तुमच्या हातात दिली आहे तर लोकांची कामे करा असा सल्लाही पवार यांनी दिला.
 
शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षक नवीन पिढी घडवण्याचे काम करतात म्हणून त्यांना पेन्शन मिळायला हवी अशी मागणी केली. सरकारने सुरुवातीपासूनच त्यांना पूर्ण पगारावर घेतले असते कुठलेही सरकार असले तरीही पेन्शन द्यावीच लागली असती असेही अजितदादा म्हणाले. अधिवेशन संपत आहे. विधी न्याय खात्याशी चर्चा करुन करा परंतु अभ्यासगट काही करु शकणार नाहीत. पळवाट काढण्याऐवजी तुम्ही सभागृहात शिक्षकांना पेन्शन योजना लागू करू असा शब्द द्या   अशी मागणीही पवार यांनी केली.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चारुलता पटेल: 87 वर्षांच्या आजीबाई ठरल्या 'फॅन ऑफ द टुर्नामेंट'