rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबण्याचे अजित पवारांनी दिले संकेत

ajit pawar
, रविवार, 23 नोव्हेंबर 2025 (13:35 IST)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 2 डिसेंबर रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान 2 डिसेंबरला होणार असून निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे.
ALSO READ: तुमच्याकडे मते आहेत, माझ्याकडे निधी आहे, अजित पवार यांनी दिले वादग्रस्त विधान
पण अजित पवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुका लांबवण्याचे संकेत दिले आहे. जिल्हा परिषदेतील आरक्षणाबाबत कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणामुळे या निवडणुका लांबण्याची शक्यता अजित पवारांनी नळदुर्ग येथे प्रचार सभेत वर्तवली आहे.  
आरक्षणाची मर्यादा 50 टक्के ओलांडली असल्याने निवडणुका लांबवू शकते. या प्रकराबाबतचीसुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु असून 25 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल येणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 
सध्या सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या या प्रकरणामुळे निवडणुका लांबणीवर जाऊ शकतात असे अजित पवार म्हणाले. निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाचा असल्याचे ते म्हणाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

SMAT 2025: सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी विदर्भ संघाची घोषणा, वेगवान गोलंदाज उमेश यादवचा समावेश