Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ शिंदेंना अजित पवारांचा टोला, 'काहींना गणेशोत्सवातही शो करायची सवय'

ajit pawar
रविवार, 4 सप्टेंबर 2022 (10:01 IST)
गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विविध ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी गेल्याचे व्हीडिओ समोर आले. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
अजित पवार म्हणाले, "यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जाताना कोणी कॅमेरा घेऊन जात नव्हतं. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो. पण आम्ही तुमच्यासारखे कॅमेरे घेऊन जात नाही.
 
"पण आता कसं गाडीसमोर कॅमेरा लावला जातो, मग कुणीतरी गाडीतून उतरतं, मग दर्शन घेताना व्हीडिओ केला जातो. आता काहींना शो करायची सवय आहे. जसा राज कपूर शोमॅन म्हणून ओळखला जायचा. तसा काहींना शो करायची सवय आहे. आता जनतेनेच पहावं काय चाललंय
 
तसंच यावेळी ते दसऱ्या मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणाविषयी सुद्धा बोलले. यंदा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे सुद्धा दसरा मेळावा घेणार असल्याचं बोललं जात आहे. पण, जनता कुणाच्या पाठिशी हे दसरा मेळाव्यानंतर कळेल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

ते म्हणाले, "जनता कुणाच्या पाठिशी आहे हे शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतर कळेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवर सभा घ्यायचे. या शिवाजी पार्कवरच शेवटी त्यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात चालेल. आज ज्यांच्या हातात पॉवर आहे ते त्यांना हवं तसं करतात. पण सामान्य जनता कोणाच्या पाठीशी आहे हे कळेल."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dr.Sarvepalli Radhakrishnan Quotes in Marathi डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे अनमोल विचार