Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुग्णांना नारळ पाण्यात दारू!

रुग्णांना नारळ पाण्यात दारू!
, गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (15:23 IST)
नागपूर : कोणताही आजरा असो, उन्हाळा असो वा हिवाळा असो, नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळ पाणी आजरांवर गुणकारी असल्याचं सांगितलं जातं. परंतू एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आले आहे ज्यात रुग्णांना नारळ पाण्यात दारू मिसळून पुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आले आहेत. 
 
हा धक्कादायक प्रकार मेडिकलमध्ये समोर आला आहे. रुग्णांच्या मागणीवर त्यांचे मित्र किंवा नातेवाईकांकडून नारळाच्या पाण्यात दारु टाकून दिलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मेडिकलच्या वॉर्डसमध्ये नारळावर बंदी घालण्यात यावी अशी मागणीच वैद्यकीय अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
 
मेडिकलमधील काही रुग्णांच्या आग्रहावरून त्यांचे नातेवाईक लपून-छपून त्यांना दारू पोहचवत असतात. वॉर्डाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात असले तरी नारळ पाणी असल्याचे सांगून पुरवठा केला जातो. काही दिवसांआधी येथील डॉक्टरांना काही रुग्ण मद्य प्राशन करून असल्याचे आढळले. त्यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सूक्ष्म निरीक्षण केले असता रुग्णाचे नातेवाईकच नारळ पाण्यात मिळवून दारू येथे आणत असल्याचे आढळले. 
 
दारू भरलेले नारळ पाणी पिऊन झाल्यावर रिकामे नारळ थेट वरच्या वार्डातून खाली फेकले जाते. त्यामुळे येथील मल वाहिनी अवरुद्ध होण्याची भीती आहे तसेच खाली उभे असणार्‍यांच्या डोक्यावर पडून ते जखमी होण्याची भीती देखील आहे. ही बाब लक्षात घेऊन रुग्णाला नारळ पाणी द्यायचे असेल तर ते ग्लासमध्ये देण्याची मागणी  वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद