Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी

traffic
, मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (20:26 IST)
अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर म्हणजे 27 ऑगस्टपासून ते गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
 
मुंबई-गोवा हायवेचं काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पळस्पे ते वाकण फाटा दरम्यान 16 टना पेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना वाहतुकीस बंदी असेल. ही वाहने जुन्या मुंबई पुणे  महामार्गावरून खोपोली ते पाली मार्गे वाकण फाटा इथं पर्यंत येतील तिथून पुढे कोकणात जातील. यातून अत्यावश्यक सेवा, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, द्रव ऑक्सीजन यांची वाहतूक करणार्‍या वाहनांना वगळण्यात आले आहे.
 
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या एका लेनच काम गणेशोत्सवाच्या आधी पूर्ण होईल  अशी ग्वाही देण्यात आलीय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्वाही दिलीय. तर डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार्‍या प्रवाशांना टोल माफ गणपतीला कोकणात  जाणार्‍यांसाठी खूशखबर आहे.
 
यंदा गणपतीला कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार्‍या प्रवाशांची टोल माफी करण्यात येणारेय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणार्‍यांचे आता 600 ते 700 रुपये वाचणार आहेत. मात्र, यासाठी पास काढावा लागणा आहे. मुंबई शहरासह ठाणे, पालघर इथल्या नागरिकांना जवळच्या पोलीस स्टेशन आणि आरटीओकडून पास घ्यावे लागणार आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रीवर्धन किनार्‍यानंतर...हरिहरेश्वर किनारी सापडले चरस