Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव, रश्मी आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा आरोप

rashmi thackare
, बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (15:22 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणायात आलीये. या याचिकेत ठाकरेंकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करण्यात आलाय. ठाकरेंनी गोळा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा अशी मागणी याचिकाकर्त्या गौरी भिडेंनी कोर्टाला केली आहे.
 
दादरच्या रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केलीये. न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.
कोर्ट कार्यालयाने याचिकेवर काही आक्षेप नोंदवले आहेत. ते दूर करण्यासाठी याचिकाकर्त्याना 14 दिवसांचा वेळ देण्यात आलाय .
 
कोर्टाने म्हटलं की, याचिकेतील आक्षेप दूर करा मग आम्ही याचिकेवर सुनावणी करू.
 
ठाकरेंचं उत्पन्न आणि संपत्ती याचा मेळ लागत नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
 
याचिकेत आरोप करण्यात आलाय की, उद्धव ठाकरे यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गानं जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे.
 
याविरोधात याचिकाकर्त्यांनी 11 जुलै 2022 ला मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार तक्रारही दाखल केली होती
 
मात्र यावर काही कारवाई करण्यात आलेली नाही.
 
याचिकेत केंद्रीय गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, CBI, मुंबई पोलीस आयुक्त, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना प्रतिवादी करण्यात आलंय
 
बीबीसीशी बोलताना गौरी भिडे म्हणाल्या, "2019 पासून काही गोष्टी समोर आल्या. पुरावे हाती लागले. ते घेऊन मी कोर्टापुढे आली आहे."
पण फक्त ठाकरे कुटुंबीयांविरोधात याचिका का? यावर गौरी भिडे पुढे म्हणाल्या, "मला अनेकांनी हा प्रश्न विचारला. मी ठाकरे कुटुंबाला जवळून ओळखते. माझे आजोबा बाळासाहेबांना चांगले ओळखायचे. मला या कुटुंबाविरोधात काही पुरावे मिळाले म्हणून मी याचिका दाखल केली."
 
त्या पुढे सांगतात, "आदित्य ठाकरेंनी 2019 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्र दिल. ते कुठे नोकरी करत नव्हते. मग त्यांच्याकडे कोट्यवधी रूपयांची संपत्ती कशी आली? हा माझा सवाल आहे." याच्या चौकशीची मी मागणी करतेय.
 
सामना आणि मार्मिक प्रकाशित करणाऱ्या 'प्रबोधन' छापखान्या शेजारी याचिकाकर्त्याच्या आजोबांचा 'राजमुद्रा' प्रकाशन छापखाना होता.
 
सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती जमा होणं, मातोश्री 2 सारखी इमारत, गाड्या, फार्महाऊसेस निव्वळ अशक्य आहे. आमचाही हाच व्यवसाय आहे. मग संपत्तीत जमीन अस्मानाचा फरक कसा? असा सवाल याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे.

Published By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसेनं दिवाळीला पोलिसांनाही बोनस देण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली