Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यासह, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, अमरावती, नाशिक या प्रमुख शहरांना नवीन पोलीस आयुक्त मिळाले

shinde devendra
, बुधवार, 14 डिसेंबर 2022 (07:34 IST)
शिंदे-फडणवीस सरकारने मंगळवारी ४१ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश जारी केले. यानुसार राज्यातील पुण्यासह, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, अमरावती, नाशिक या प्रमुख शहरांना नवीन पोलीस आयुक्त मिळाले आहेत. तसंच अनेक अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोणकोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली?
अपर पोलीस महासंचालक :
सदानंद दाते - अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
 विश्वास नांगरे-पाटील - अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई [पदोन्नतीने] (श्री. विनय कुमार चौबे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)
मिलिंद भारंबे - पोलीस आयुक्त, नवी मुंबई [पदोन्नतीने]
राज वर्धन - अपर पोलीस महासंचालक- नि- सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. [ पदोन्नतीने]
विनय कुमार चौबे - पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड [पद उन्नत करुन]
अमिताभ गुप्ता - अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य, मुंबई
निकेत कौशिक -अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. (श्री. प्रभात कुमार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)
विशेष पोलीस महानिरीक्षक :
शिरीष जैन - सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
संजय मोहिते - विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, मुंबई.
पोलीस उप महानिरीक्षक :
नवीनचंद्र रेड्डी - पोलीस आयुक्त, अमरावती शहर
आरती सिंह - अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस, बृहन्मुंबई
नामदेव चव्हाण - पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे
निसार तांबोळी - अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई
ज्ञानेश्वर चव्हाण - अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई
रंजन कुमार शर्मा - अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई
याशिवाय विनित अगरवाल, बिपिन कुमार सिंह, देवेन भारती, प्रभात कुमार, महेश पाटील या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली असून ते अद्याप पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत.
अपर पोलीस महासंचालक :
रितेश कुमार - पोलीस आयुक्त, पुणे शहर
मधुकर पांडे - पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई-विरार
प्रशांत बुरडे - अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
विशेष पोलीस महानिरीक्षक :
सत्यनारायण चौधरी - पोलीस सह आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था, बृहन्मुंबई
निशित मिश्रा - पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई
प्रवीण पडवळ - पोलीस सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई
लखमी गौतम - पोलीस सह आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई
एस. जयकुमार - पोलीस सह आयुक्त, (प्रशासन), प्रशासन, बृहन्मुंबई
अंकुश शिंदे - पोलीस आयुक्त, नाशिक शहर
प्रवीण पवार - विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण
सुनिल फुलारी - विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
पोलीस उप महानिरीक्षक :
अनिल कुंभारे - अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
परमजीत दहिया - अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
विनायक देशमुख - अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
राजीव जैन - अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
याशिवाय सुहास वारके, राजकुमार व्हटकर, जयंत नाईकनवरे, बी. जी. शेखर, संजय दराडे आणि विरेंद्र मिश्रा या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली असून ते अद्याप पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील फुटबॉलच्या विकासासाठी एफ.सी. बायर्न म्युनिक यांच्यासोबतचा सामंजस्य करार महत्त्वाचा – क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन