Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली यांचा साखरपुडा

amit-thackeray-and-mitali-borude-to-get-engaged
, सोमवार, 11 डिसेंबर 2017 (08:32 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा आज साखपुडा होत आहे. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानावर घरगुती पद्धतीने हा साखरपुडा होईल.अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. 

मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची ती मुलगी आहे.राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काह वर्षांपूर्वी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

अमित ठाकरेही तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंप्रमाणे ते फार सक्रीय नाहीत. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचा जोरदार प्रचार केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारकडून तब्बल 3,755 कोटी जाहिरातींवर खर्च