Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेल्फीवादावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रीया

amruta fadnavis
, सोमवार, 22 ऑक्टोबर 2018 (08:10 IST)
मुंबई ते गोवा या जलमार्गावरील ‘आंग्रीया’क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन सेल्फी काढल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अमृता फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. मी एका क्रूझवर होते. मी ज्या जागी बसली होती ती जागा सुरक्षित होती. मी सेल्फी काढायला गेले नव्हते. मी बऱ्याच दिवसांनी शुद्ध हवेचा अनुभव घेत होते, असे त्यांनी म्हटले आहे.
 
शनिवारी मुंबईत आंग्रीया क्रूझचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आंतरदेशीय क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई ते गोवा या जलमार्गावर ही क्रूझसेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, हा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या सेल्फीमुळे चर्चेचा विषय ठरला होता. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लेनोवोने कमी किंमतींमध्ये वैशिष्ट्य वैशिष्ट्येसह दोन स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केले