सध्या देशात महिलांवर आणि मुलींवर होणारे लैंगीक अत्याचार थांबतच नाही आहे.देशात सर्वत्र निर्दशने करून देखील मुलींवर होणारे अत्याचार थांबतच नाही. बदलापूरच्या घटने नंतर आता जळगाव मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. नराधमाने आपल्या मुलीच्या 11 वर्षाच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पीडित मुलगी लपंडाव खेळत असताना ती जवळच्या घरात जाऊन लपली. तिला तिच्या मैत्रिणीच्या 40 वर्षाच्या वडिलांनी बघितले आणि आतून कडी लावून तिच्यावर अत्याचार केले. मुलीने विरोध केले असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर मुलीला नैराश्य आले. तिच्या पालकांना तिच्या स्वभावातील होणारे बदल लक्षात आले त्यांनी तिची विचारपूस केली असता तिला रडू कोसळले आणि तिने घडलेलं सर्व सांगितले. हा सर्व प्रकार पालकांना समाजतातच त्यांना धक्काच बसला. त्यांनी मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेननंतर आरोपी पळून गेला. महाराष्ट्र पोलिसांनी त्याची लोकेशन ट्रेस करून त्याला मुंबईतून अटक केली.