Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईच्या रुग्णालयाच्या आवारात वृद्ध महिलेला कारची धडक, महिलेचा मृत्यू

मुंबईच्या रुग्णालयाच्या आवारात वृद्ध महिलेला कारची धडक, महिलेचा मृत्यू
, शनिवार, 25 मे 2024 (19:27 IST)
मुंबईच्या लोकमान्य टिळक महापालिका सामान्य रुग्णालयाच्या परिसरात वृद्ध महिलेला कारची धडक बसून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.     
 
शीव येथे शुक्रवारी रात्री भरधाव वेगाने आलेल्या कार ने एका वृद्ध महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक महापालिका सामान्य रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी एक डॉक्टर वेगाने गाडी चालवत होता त्याने वृद्ध महिलेला धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेची ओळख अद्याप पटू शकली नाही. या प्रकरणी प्राथमिक तपास अहवाल नोंदवला गेला असून पोलीस अधिक तपास करत आहे. अद्याप डॉक्टरला अटक केली नाही.  
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या आजोबांनी चालकाला भेटवस्तू आणि रोख रकमेचे आमिष दाखवले,पोलिसांचा धक्कादायक खुलासा