पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाज सोमवारपासून संसदेत सुरू होणार असतानाच सरकारविरोधात रणनीती ठरवण्यासाठी विरोधक पुन्हा एकदा बैठक घेत आहेत. पेगासस आणि शेतकऱ्याच्या मुद्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहात पुन्हा एकदा गदारोळ होण्याची शक्यता आहे. सरकारचे आवाहन असूनही विरोधी पक्ष मवाळ भूमिका घ्यायला तयार नाही.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज एक महत्त्वाचे विधेयक मांडले जाणार आहे. संविधान (127 वी सुधारणा) विधेयक, 2021 सोमवारी लोकसभेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार सादर करतील. मागासवर्गीय (ओबीसी) ओळखण्यासाठी राज्यांची शक्ती पुनर्संचयित करण्याचे हे विधेयक आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी विरोधी नेत्यांनी बैठक सुरू केली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाज सोमवारपासून संसदेत सुरू होणार असतानाच विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या दालनात सकाळी बैठक होईल.