Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी, परिसरात बेवारस बॅग सापडली

देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी, परिसरात बेवारस बॅग सापडली
, सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (17:15 IST)
नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी आली आहे. या धमकीनंतर देवळाली रेल्वे स्टेशनवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी देवळाली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बेवारस बॅग सापडली होती. आर्मी रेस्ट हाऊस येथील एका कचरा पेटीमध्ये ही बॅग सापडली. बॉम्बशोधक पथाने घटनास्थळी धाव घेत ही बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये कपडे, प्लास्टिकच्या पिशव्या आणि खाद्यपदार्थ सापडले. त्यामुळे या बॅगपासून कसलीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. त्यामुळे बॉम्बशोधक पथकासह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र ही बॅग कोणाची याबाबत अद्याप उलगडा झाला नाही.
 
देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनला बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी रविवारी देण्यात आली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे ही धकमी देण्यात आली. या पत्रात पुढच्या दोन दिवसांमध्ये देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलीस यंत्रणा आणि रेल्वे सुरक्षा पोलीस सतर्क होत त्यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला. बॉम्ब शोधक पथकाकडून रेल्वे स्थानकाचा परिसर श्वानांच्या सहाय्याने तपासण्यात आला. दरम्यान, बॉम्बशोधक नाशक पथकाद्वारे रविवारी देवळाली रेल्वे स्थानक आणि परिसराची तपासणी करण्यात आली. या पथकाकडून श्वानांमार्फत संपूर्ण परिसराची तपासणी केली. मात्र कोठेही कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिला फुटबॉल: तुर्की वुमन्स कपमध्ये खेळणार भारतीय टीम