Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आणि मोठा अनर्थ टळला, कंटेनर रेल्वे बोगद्याच्या कठड्याला अडकला

आणि मोठा अनर्थ टळला, कंटेनर रेल्वे बोगद्याच्या कठड्याला अडकला
, शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (21:33 IST)
मुंबई-आग्रा महामार्गावर जुन्या कसारा घाटात कोळशाचा कंटेनर अचानक २५० फूट दरीमध्ये कोसळला. वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. मात्र, वाहनचालकाने वेळीच कंटेनरबाहेर उडी मारल्याने तो बचावला. मात्र, कंटेनर पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. दरम्यान, हा अपघात होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच रेल्वे मार्गावरुन  रेल्वे एक्सप्रेस गेली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
 
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून नाशिकच्या दिशेने कोळशाने भरलेला कंटेनर (क्र. MH 15 EV 9826) आज सकाळी  येत होता. हा कंटेनर कसारा घाट चढत होता. त्याचवेळी हिवाळा ब्रिजच्या अलीकडील वळणावर एका अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करतेवेळी कंटेनरलाहूल दिली. त्यामुळे चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर संरक्षक कठडे तोडून थेट २५० फूट खोल दरीत कोसळला. कंटेनरचालक अनिल श्रीकृष्ण रोडे (रा. बीड) याने प्रसंगावधानाने कंटेनरबाहेर उडी टाकली. त्याला थोडी दुखापत झाली असून तो सुखरुप आहे. मात्र, कंटेनर थेट दरीत जाऊन रेल्वे बोगद्याच्या कठड्याला अडकला. या अपघातात कंटेनरचा पूर्ण चेंदामेंदा झाला. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, महामर्ग पोलीस घोटी केंद्र, कसारा पोलीस, टोल यंत्रणा 1033 च्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
 
कंटेनरचा अपघात खूप भीषण होता. कसारा घाटाच्या खाली २५० फूट खोल दरीलगत रेल्वे मार्ग आहे. या मार्गावर मध्य रेल्वेची सेवा असते. कंटेनर दरीत मोठ्या वेगाने कोसळला. मात्र, हा कंटेनर रेल्वे ट्रॅक मार्गाच्यावर असलेल्या बोगद्याच्या दगडी भिंतीवर अडकला म्हणून पुढील मोठा अनर्थ टळला. जर अजून एक फूट जरी कंटेनर खाली गेला असता तर तो ट्रकवरच पडला असता. अपघात झाल्यावर १० मिनिटांनी या रेल्वे मार्गावरून मुंबईकडे  जाणारी एक्सप्रेस रवाना झाली होती. एक्सप्रेस व कंटेनर अपघाताची वेळ सारखीच असती तर रेल्वेच्या कंपनामुळे कंटेनर थेट रेल्वेवर सुद्धा कोसळला असता. आणि मोठी जीवितहानी झाली असती. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनंदन, महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”