Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

राजेश क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

Angioplasty surgery on Rajesh Kshirsagar राजेश क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया
, शुक्रवार, 27 मे 2022 (16:04 IST)
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर कोल्हापूर शहरातील डायमंड हॉस्पीटल येथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सातत्याने गेले तीन -चार दिवस होणाऱ्या बैठका, काल छत्रपती ताराराणी चौक येथील आंदोलन आणि सातत्याने नियोजन मंडळाच्या होणाऱ्या बैठका यामुळे झालेला कामाचा अतिरिक्त ताण क्षीरसागर यांना जाणवत होता. काल मध्यरात्री छातीत सौम्य पेन होऊ लागल्याने त्यांना तात्काळ डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर अँजिओग्राफी तपासणी करण्यात आली. यामध्ये एक शीर ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यामुळे तात्काळ क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. साईप्रसाद यांच्या देखरेखीखाली क्षीरसागर यांच्यावर उपचार सुरु असून, सद्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी स्वत: संपर्क साधून राजेश क्षीरसागर यांच्या प्रकृतीबाबत आपुलकीने विचारपूस केली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही मुख्यमंत्री महोदयांनी संवाद साधला. यासह शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, मा. परिवहन मंत्री आमदर दिवाकर रावते यांनीही संपर्क साधून क्षीरसागर यांची विचारपूस केली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर