सायन रुग्णालयातील झाडे डॉक्टरांच्या वसाहतीसाठी तोडली जात आहे. त्यासाठी 158 झाडे कापण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. एकाद्याच घर बनवण्यासाठी कित्येक पक्षींचे घर तोडले जात आहे. झाडांमुळे ऑक्सिजन मिळते. ऑक्सिजन किती आवश्यक आहे हे आपण सर्वानीच कोरोनाकाळात बघितलं आहे. आपण आपल्या माणसाचा जीव वाचावा म्हणून ऑक्सिजन विकत घेतले होतं. या झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते. मग आपण त्या प्राण वायू देणाऱ्या झाडांचे प्राण कसे काय घेऊ शकता. ? हे टाळता येत असेल तर त्याकडे विचार करावा. असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?? याला दुसरा काहीच पर्याय सायन रूग्णालयाकडे नाही का? मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रूग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्षांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत. pic.twitter.com/CoJtCD77cI
— sayaji shinde (@SayajiShinde) May 5, 2022