Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरावतीत इंजेक्शन देऊन जनावरांची चोरी

Animal
अमरावती , गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (19:16 IST)
रस्त्यावरील मोकाट असलेल्या जनावरांची कारमधून तस्करी होत असल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे  येथे समोर आली आहे. धामणगाव रेल्वेतील शिवाजी चौकात 27 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजता रस्त्यावरील मोकाट जनावरे असताना एका गाडीतून 3 माणसे उतरली आणि जनावरांना इंजेक्शन लावून त्यांना फोर व्हीलर गाडीत कोंबून नेत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस झालं आहे.
 
त्यानंतर लगेच हीच इनोव्हा गाडी रात्री 1 वाजून 18 मिनिटांनी परत येऊन शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या जनावरांना गाडीत कोंबून टाकत नेत असल्याची घटना सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इतकंच नाही तर 2 मिनिटांनी पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी मागेच आली आहे. हा सगळा प्रकार रात्री 1 ते 1 वाजून 29 मिनिटांच्या कालावधीत झालाय. मात्र पोलिसांना या घटनेविषयी काहीही माहिती नसल्याच पोलीस सांगताहेत. त्यामुळे येथे नक्कीच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. धामणगाव परिसरात जनावरे पळविणारी टोळी सक्रिय असल्याने परिसरातील नागरिकांनी वेळीच सावध होणे मात्र गरजेचे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

२० रुपयांवरून ३ रुपये झाले आधार पडताळणी शुल्क